Gatt full form in marathi

 Full form of GATT in marathi 

  • GATT हा एक आंतरराष्ट्रीय करार असून सध्या ती संपुष्टात आलेली आहे; तरी त्याची जागा WTO या आंतरराष्ट्रीय संघटनेने घेतली आहे. GATT ही संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापारी नियमनाच्या दृष्टिकोनातून अभ्यासले जाणे आवश्यक आहे.
 चला तर मग पाहू : 👇👇
  • GATT meaning काय आहे ?
  • GATT full or long form काय आहे ?
  • GATT म्हणजे काय ?
  • GATT स्थापनेमागची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे कोणती होती ?
GATT - General Agreement of Tariffs and Trade 

आयात शुल्क व व्यापारविषयक सामान्य करार

gatt information in marathi

 GATT ची पार्श्वभूमी 👇👇 
  • 1929 ते 1933 च्या जागतिक मंदीने आंतरराष्ट्रीय व्यापार काेळमडीस आला होता. याच पार्श्वभूमीमुळे अनेक देशांनी आपल्या देशांचे किंबहुना अर्थव्यवस्थांचे संरक्षण करण्यासाठी आयतीवर बंधने घातली होती. 
  • तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1939 ते 45 अनेक देशाने एकमेकाविरुद्ध संरक्षक कर बसविल्यामुळे जागतिक व्यापारात मोठी घट झाली होती. What is GATT in marathi ?
  • वरील पार्श्वभूमीमूळे  जागतिक व्यापार आणि रोजगार वाढण्याच्या दृष्टीने 30 ऑक्टोबर 1947 रोजी 23 देशांनी जिनिव्हा येथे व्यापारावरील आयात कर कमी करण्याच्या दृष्टीने एक अंतरिम यंत्रणा म्हणून एक करार केला. हाच करार म्हणजे (गॅट) GATT करार होय. GATT करार 1 जानेवारी 1948 पासून अंमलात आला.

 GATT ची उद्दिष्टे 👇 
  • सर्व देशांना आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापारासाठी समान संधी उपलब्ध करून देणे.
  • व्यापारावरील आयात शुल्क व इतर बंधने कमी करून परस्पर कायदे सर्व देशांना प्राप्त करून देणे.
  • आंतरराष्ट्रीय व्यापारातून राष्ट्र राष्ट्रांमधील भेदभाव व तंटे नष्ट करणे.
  • सर्व सदस्य राष्ट्रांना सल्ला व सहकार्य करणे.
  • सर्व देशातील सर्व देशांचे नागरिकांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे.  
GATT हे 1948 पासून जागतिक व्यापाराचे नियमन करणारी तात्पुरत्या स्वरूपाचे अनौपचारिक संघटना होती. 12 डिसेंबर 1995 रोजी गेट संपुष्टात आला. पण या आधीच त्याची जागा WTO (डब्ल्यूटीओ) या संघटनेची घेतले.


     WTO (डब्ल्यूटीओ) ची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी झाली होती.
WTO (डब्ल्यूटीओ) च्या सविस्तर माहितीसाठी  क्लिक करा. 

Post a Comment

0 Comments